आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगुल गाण्यांचे चित्रीकरण कठीण - रजनीकांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - रजनीकांत. जेवढे नाव मोठे, तेवढेच कामही. आतापर्यंत १७० चित्रपटांतील अभिनयाचा अनुभव गाठीशी, परंतु सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणा-या रजनीला ड्यूएट्स गाणी चित्रित करताना कठीण गेले, असे सांगूनही खरे वाटणार नाही. त्यांच्या चाहत्यांना तर नाहीच. मात्र स्वत: रजनीने हे नमूद केले.
आगामी ‘लिंगा’मध्ये त्यांना हा अनुभव आला. आगामी चित्रपटाची निर्मिती खूप कष्टानंतर झाली आहे. अ‍ॅक्शन दृश्ये किंवा रेल्वेतील फायटिंग, साहसी दृश्ये केली, असा त्याचा अर्थ नाही. मला सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का यांच्या सोबतची ड्यूएट्स गाणी चित्रित करताना काहीसे कठीण वाटत होते. सोनाक्षीला मी लहानपणापासून आेळखतो. माझ्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्याप्रमाणेच मी सोनाक्षीलाही लहानाचे मोठे होताना पाहिले. मात्र आगामी चित्रपटातील शूटिंगदरम्यान मला सारखा घाम येत होता. पहिल्या टेकपासूनच मला उगाच घाम येत होता. वयाच्या ६० वर्षांनंतर युगुल गीताचे चित्रीकरण करणे योग्य नसावे. म्हणूनच देव कदाचित माझ्यासारख्या कलावंताला जणू शिक्षा करत असावा, असे मला वाटले. ‘लिंगा’ चित्रपटासंबंधी सोमवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात रजनीने हा अनुभव मांडला. हा चित्रपट १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. लिंगा चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. मोठे धरण प्रकल्पाचे बांधकाम हा कथानकाचा मुख्य भाग आहे. केवळ सहा महिन्यांत हा चित्रपट तयार झाला.