आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऱ्या पाण्यामुळे या गावातील युवकांचे ठरत नाही लग्न; अनेकांना सोडावे लागले गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहगांव- मध्य प्रदेशातील  गाता हे गाव खाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रासले आहे. खाऱ्या पाण्यामुळे लोकांच्या चवीतच नव्हे तर आयुष्यातही खारेपणा आला आहे. खाऱ्या पाण्याच्या कारणामुळे कुणीच इथल्या युवकांना मुलगी द्यायला तयार नाहीत. त्यामुळे येथे शेकडो युवक अविवाहित आहेत. मात्र, गाव सोडून ग्वालियर, भिंड, मेहगाव किंवा अन्य गावी गेलेल्यांचे संसार सुरळीत सुरू आहेत. 

१३० लोकांचे अजूनही झाले नाही लग्न   
खाऱ्या पाण्याच्या या समस्येमुळे आतापर्यंत १३० जण अविवाहित आहेत. ४६ वर्षीय मूलचंद तसेच भुरे तिवारी यांचे ४० वर्षीय बलराम तिवारी यांची गोष्ट सारखीच आहे. गाव सोडून न गेल्याची त्यांना खंत आहे. भुरे तिवारी यांच्या ग्वालियरला राहावयास गेलेल्या तीन भावंडांचे लग्न झाले. सरपंच सेवाराम मिर्धा सांगतात की, आम्ही ही अडचण अनेकदा अधिकाऱ्यांकडे नेली, पण त्यावर अपेक्षित असे काहीच होऊ शकले नाही. बेसली नदीवर धरण बांधण्यात आले. या पावसाळ्यात त्यात पाणी जमा झाल्यास गोड पाणी मिळू शकते.  

गावात १५ हातपंप, पण पाणी एकालाच 
नळयोजनेद्वारा गोड पाणी आणण्यासाठी २००८ मध्ये २४ लाख रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली, पण ती शोभेची बाहुलीच ठरली. कुणाच्याच घरी पाणी पोहोचू शकले नाही. एक हंडा गोड पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांना बीहड या गावापर्यंत किमीची पायपीट करावी लागते. हजार लोकसंख्येच्या या गावात १५ हातपंप आहेत, पण त्यापैकी फक्त एकातूनच पाणी येते.