आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dulhan Scam Disclose In Uttar Pradesh, Beneficiers Women Alerady Get Married

उत्तर प्रदेशात ‘दुल्हन घोटाळा’, लाभधारक महिलांपैकी काही जणींचा आधीच विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात कोट्यवधींचा ‘दुल्हन घोटाळा’ उघडकीस आला आहे. विवाह मदत योजनेचा लाभ घेणा-या महिलांपैकी काही जणींचा आधीच विवाह झाला आहे, तर काही विधवा आहेत. एवढेच नव्हे, तर काही जणी चक्क ‘आजी’ आहेत.

अल्पसंख्याक गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी सुरू केलेल्या योजनेत मुलीला सरकार १० हजार रुपये मदत देते. मात्र, बरेली, बदायूं, पिलिभीत जिल्ह्यांत नातवंडे असणा-या अनेक वृद्धांनीही योजनेअंतर्गत पैसे घेतले. अविवाहित मुलींचाही घोटाळ्यात समावेश असून त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेतला आणि गायब झाल्या.