आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन योग्यच - अखिलेश यादव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन योग्यच असल्याचा पुनरुच्चर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. वाळू माफियांविरोधात निर्णय घेतल्यामुळे नव्हे तर धार्मिक स्थळाची भिंत पाडण्याचे आदेश त्यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत न करता दिले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई योग्य आहे, असे अखिलेश यांचे म्हणणे आहे.


दुर्गाशक्ती नागपाल
दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचा वाद वाढू लागला आहे. ज्या कारणासाठी नागपाल यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. ते कारण फोल ठरवणारा अहवाल गुरुवारी जाहीर झाला. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यानुसार धार्मिक स्थळाची भिंत नागपाल यांच्या आदेशावरून नव्हे तर गावकर्‍यांनीच पाडली. स्थानिक लोकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु लोकांनी जुमानले नाही. नागपाल यांच्या करिअरला सुरू होऊन जेमतेम दहा महिने झाले आहेत. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, असे ऑल इंडिया आयएएस संघटनेचे अध्यक्ष संजय भूस रेड्डी यांनी म्हटले आहे.

दुर्गाचे मौन : ‘भास्कर’ने दुर्गाशक्ती यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी या मुद्दय़ावर मौन ठेवले आहे. हा प्रश्न खूप वाढला आहे. त्यावर मला काहीही बोलायचे नाही. परंतु 1969 च्या ऑल इंडिया सर्व्हिस डिसिप्लीनरी अपील अँड रूलमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी आयएएस संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मंत्री सामी यांना भेटले आहेत, एवढेच मला ठाऊक आहे, असे दुर्गाशक्ती यांनी सांगितले.