आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Durga Shakti Nagpal's Husband Suspended For Punishing Teacher

युपी : आयएएस दुर्गाशक्तीचे अधिकारी पती सस्पेंड, शिक्षकाला कोंबडा बनवल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - दुर्गाशक्ती नागपाल

मथुरा - अवैध वाळू उत्खनन प्रकरणाच्या विरोधात खडक भूमिका घेतल्यानंतर आणि एका मशिदीची भिंत पाडल्यानंतर चर्चेत आलेल्या दुर्गाशक्ती नागपाल यांच्या अधिकारी पतींना समाजवादी पार्टीच्या सरकारने शनिवारी सस्पेंड केले. दुर्गाशक्ती यांचे आयएएस पती अभिषेक सिंह यांच्यावर एका ज्येष्ठ शिक्षकांना चुकीची वागणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यांच्यावर या शिक्षकांना त्यांच्याच ऑफिसमध्ये कोंबडा बनायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांना कान पकडून उठबशा काढायला लावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकारानंतर हे शिक्षक डिप्रेशनमध्ये आले होते. मतदार यादी तयार करण्यात उशीर झाला एवढाच पीडित शिक्षकाचा गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर नाराज झालेल्या शिक्षकांनी अभिषेक यांच्या विरोधात आंदोलन केले. युपीच्या मुख्यमंत्र्यांनी लगेचच या प्रकरणाची दखल घेत त्यांना सस्पेंड केले.

कोण आहेत दुर्गाशक्ती नागपाल?
गौतमबुद्ध नगर (नोएडा) मध्ये दुर्गाशक्ती नागपाल यांना कादलपूर गावात एका बांधकाम सुरू असलेल्या मशीदीची भिंत पाडल्या प्रकरणी सपा सरकारने सस्पेंड केले होते. सरकारने त्यावर असे स्पष्टीकरण दिले की, दुर्गाशक्ती यांच्या या पावलामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मात्र, दुर्गाशक्ती यांनी वाळू माफियांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप युपी सरकारवर लागला होता. त्यानंतर अधिका-यांच्या संघटनांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यानंतर दुर्गाशक्तीचे निलंबन मागे घेण्यात आले होते.