आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंच भिंतीवरून कंगनाने घोड्यावर मारली उडी, पाय चुकीच्या ठिकाणी पडला अन् झाले असे हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - मेहरानगड किल्ल्यात आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या शूटिंगदरम्यान स्टंट सीन करताना मंगळवारी रात्री उशिरा अॅक्ट्रेस कंगना रनोट जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. जोधपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बुधवारी दुपारी ती विश्रांतीसाठी मुंबईला रवाना झाली. डॉक्टरांनी तिला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

- जोधपूरच्या गोयल रुग्णालयाचे डॉ. नरेंद्र यादव म्हणाले की, कंगनाचा पाय मुडपला आहे. एक्सरेमध्ये फ्रॅक्चर आढळले नाही, परंतु तरीही प्लॅस्टर करण्यात आले आहे. कंगनाला एक आठवडा विश्रांतीचाही सल्ला देण्यात आला आहे. कंगनाला रात्री बारा वाजता गोयल रुग्णालयात आणण्यात आले. तब्बल दीड तास ती रुग्णालयात राहिली. आणि यानंतर तिच्यासोबत असलेल्यांनी तिला हॉटेलकडे नेले. 


कंगनाने सांगितले कशी झाली दुखापत
- मुंबईला जाण्यासाठी व्हीलचेअरवर एअरपोर्टला पोहोचलेली कंगना म्हणाली की, ती एका भिंतीवरून घोड्यावर उडी मारून बसण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान ती खाली पडली आणि तिला दुखापत झाली.

 

येथे सुरू आहे शूटिंग...
- झाशीच्या राणीच्या जीवनावर बेतलेल्या मणिकर्णिका चित्रपटात कंगना मुख्य भूमिका करत आहे. अनेक दिवसांपासून कंगना जोधपूरमध्ये या चित्रपटाची शूटिंग करत आहे. जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यात रात्री साडे अकरा वाजता एका स्टंट सीनदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली. उंचीवरून उडी मारताना कंगनाचा पाय चुकीच्या जागी पडला आणि तिच्या पायाला दुखापत झाली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज

बातम्या आणखी आहेत...