आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dust Storm Kills At Least 27 In Uttar Pradesh News In Divya Marathi

उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळामुळे 27 जणांचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशात आलेल्या धुळीच्या वादळामुळे किमान 27 जण ठार, तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये धुळीच्या वादळाने कहर केला असून फर्रुखाबादमध्ये 10, बाराबांकीमध्ये दोन मुलांसह 6 तर लखनऊ, सीतापूर, हरदोही, जलौनमध्ये प्रत्येकी दोन आणि फैजाबादमध्ये एक जण ठार झाला. प्रचंड वावटळी उठून अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले, झोपड्या उडून गेल्या. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

फर्रुखाबाद जिल्ह्यात मेमपूर कात्री, मल्लाई, दियापूर, करणपूर, बुधैया, जारवा या खेड्यांमध्ये धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसामुळे भिंत आणि वृक्ष कोसळून दहा जण ठार झाले. बाराबांकी जिल्ह्यात कोटवा सडक, सिंदवाही, देब्रा, दादीमाऊ, मोहसंद या खेड्यांमध्येही प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतही भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.