आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Cabinet Meeting News In Marathi, Andhra Pradesh, Chandrababu Naidu

आंध्रमध्ये देशातील पहिली ई-कॅबिनेट बैठक, सर्व मंत्र्यांकडे होते आयपॅड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - आंध्र प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी सकाळी सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत कोणाच्याही हातात कागद-पेन नव्हता. त्यांच्यासमोर होते आयपॅड. देशातील ही पहिली ई-कॅबिनेट बैठक होती. राज्यात कॅबिनेटच्या अजेंड्यापासून फायलींवरील चर्चा पेपरलेस पद्धतीने झाली. गोवा विधानसभाही ९५ टक्के पेपरलेस स्वरूपाची आहे.

कॅबिनेटमध्ये चर्चा होणा-या योजनेशी संबंधित फाइल मंत्र्यांच्या आयपॅडवर उपलब्ध होणार.
एखाद्या मंत्र्याचा आयपॅड हरवला तर तक्रार येताच त्यात उपलब्ध असलेला डाटा सर्व्हरमधून आपोआप डिलिट होईल.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी ई-कॅबिनेटसाठी पुढाकार घेतला. मंत्र्यांना काही दिवसांपूर्वी आयपॅडचे प्रशिक्षण देण्यात आले. नायडू जेव्हा १९९५ ते २००४ या कालावधीत मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी ई-गव्हर्नन्ससाठी विवधि उपक्रम हाती घेतले होते.

एसएमएसद्वारे पासवर्ड
कॅबिनेटच्या कामकाजासाठीच्या अ‍ॅपद्वारे कॅबिनेटचा संपूर्ण अजेंडा मंत्र्यांनी आयपॅडवर वाचला.
बाहेरच्या व्यक्तीला अजेंडा कळू नये म्हणून एसएमएसद्वारे पासवर्ड पाठवण्यात आला.
काही मंत्र्यांनी फायली सादर करण्याऐवजी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले.