आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकपूरथळा (पंजाब)-सुलतानपूर लोधीच्या श्री गुरू हरिकिशन पब्लिक स्कूलमध्ये प्रत्येक वर्गात एक जुळे शिक्षण घेतात. केजीपासून ते 12 वी इयत्तेपर्यंत 13 जुळी आहेत. मुले जुळी असली तरीही प्रत्येकाचे छंद वेगळे आहेत. सहाव्या इयत्तेतील लवलीनला टेनिस आवडते, तर तिची बहीण जसलीनला वाचन. पाचवीतल्या अमनदीपला क्रिकेट खेळणे आवडते, तर त्याचा भाऊ कुंवरदीपला फुटबॉल सामने पाहण्याचा छंद आहे.जुळ्यांची ओळख ठेवण्यासाठी शिक्षकांनाही लक्ष द्यावे लागते.नववीतले पंकज व प्रशांत वत्स यांनी अनेक वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुख्याध्यापिक जसवीर वधवा म्हणाल्या, आम्ही मुलांना रोज पाहतो तरीही अनेक वेळा संभ्रमात पडतो. शाळेत कार्यक्रम होतात. सर्व एकत्र असतात त्या वेळी अधिक गोंधळ उडतो.13 जुळे भाऊ-बहीण आहेत. या मुलांचे शिक्षकच नव्हे, तर आई-बाबाही अनेक वेळा चकतात. चूक एक करतो, बोलणे दुस-यालाच खावे लागते. काही जणांच्या स्कूल बॅगही सारख्याच असतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.