आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा बलात्कारीच्या डेरात आजपासून शोधमोहीम सुरू; खात्यांच्या तपासणीसाठी 100 कर्मचारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा- पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून डेरा सच्चा सौदा येथील मुख्यालयात शोधमोहिमेसाठी नियुक्त कोर्ट कमिशनर ए. के. पवार गुरुवारी दुपारी सिरसा येथे पोहोचले. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन तास बैठक घेऊन शोधमोहिमेसाठी प्रशासनाने बनवलेल्या रणनीतीचा आढावा घेतला.  शुक्रवारी डेरात शोधमोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हरियाणाच्या जनसंपर्क विभागाचे चंदिगडचे उपसंचालक सतीश मेहरा म्हणाले की, डेरा मुख्यालयात शुक्रवारी शोधमोहीम हाती घेण्यात येईल. त्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. १०० बँक कर्मचाऱ्यांनाही शोधमोहिमेत सहभागी करण्यात आले आहे. 
 
डेराकडे जाणारे सर्व रस्ते सील 
डेराच्या आसपास सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. तेथील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. गुरुवारी डेराला लागून असलेल्या शाहपूर बेगू, नेजियाखेडा आणि बाजेकां या तीन गावांत संचारबंदीत कोणतीही सूट देण्यात आली नाही. सध्या सिरसाच्या आसपास लष्कराच्या चार तुकड्या तैनात आहेत. त्याशिवाय निमलष्करी दलाच्या ४१ तुकड्यांनी तळ ठोकला आहे. त्यात सीआरपीएफच्या २०, सशस्त्र सीमा दलाच्या १२, आयटीबीपीच्या ५, आरएएफआणि बीएसएफच्या प्रत्येकी दोन तुकड्यांचा समावेश आहे. मधुवन येथून कमांडोंची स्वात तुकडी, बॉम्बनाशक तुकडी आणि ४ श्वानपथकेही सिरसाला आली आहेत. 
बातम्या आणखी आहेत...