आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड: गंगेतून मृतदेह काढण्‍यासाठी नौदल तैनात, भूकंपाने हादरले डोंगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्‍तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाला आज 11 दिवस झाली तरी देखील तेथील निसर्गाचा प्रकोप थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. उत्तराखंडातील कुमायूचे काही परिसर आज (गुरुवारी) भूंकपाने हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.2 एवढी मोजण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जिवित हानी झालेचे वृत्त नाही.
दुसरीकडे हरिद्वारमध्ये गंगा नदीत वाहून आलेले मृतदेह काढण्यासाठी नौदलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

पोलिस महासंचालक (डीजीपी) सत्यव्रत यांनी सांगितले, की के बहुतेक मृतदेहांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह आणि त्यांच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सर्व मृतदेहांचा पंचनामा करून त्यांचे छायाचित्रेही काढण्यात आली आहेत.

गढवालसह पसिरातील ढिगारे उपसण्याचे काम सुरु असून मृतदेहाची संख्या वाढत आहे. केदारनाथमध्ये काल (बुधवारी) 18 लोकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजूनही 3500 हजार लोक वेळवेगळ्या ठिकाणी अडकले आहे. बचाव कामात अनेक अडथडे येत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस जटील होत चालली आहे.

सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 822 लोकांचा मृत्यू झाला असून 436 जखमी झाले आहे. तसेच 344 जण अजूनही बेपत्ता आहे. याशिवय 1829 लोक अजूनही अडकले आहे. एनडीएमएनुसार 2232 घरांची पडझड झाली असून आतापर्यंत 1,04,095 लोकांना वाचवण्यात आले आहे.

बचाव कार्यात कार्यरत असलेल्या केंद्रिय संस्थांच्या अहवालानुसार ढिगार्‍याखालून मोठ्यासंख्येने मृतदेह बाहेर येण्‍याची शक्यता आहे. दुसरीकडे पाण्यात वाहून गेलेल्या लोकांचेही मृतदेह सखल भागात आढळून येत आहेत. उत्‍तराखंडातून मृतदेह वाहून उत्तरप्रदेशात पोहचले आहेत. यावरून उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलय किती भयकंर असेल याचा अंदाजा लावता येतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, बचाव कार्य आणि उद्‍ध्वस्त झालेले उत्तराखंड...