श्रीनगर - काश्मीरमध्ये आज (शनिवारी) पहाटे 2.29 वाजता मध्यम तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यूएस जियोलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे केंद्र पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासासून 16 किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्वमध्ये 26 किलोमीटर खोल याचे केंद्र होते, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, भूकंपामुळे कोणीतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही रात्री 1.59 वाजता (पाकिस्तानच्या वेळेनुसार) 5.1 तीव्रतेच्या भूंकपाचे झटके जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.