आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंंगळुरुत नोटा बदलून देताना RBI च्या अधिकार्‍याला अटक, 93 लाखांची रोकड जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अधिकार्‍याला सीबीआयने नोटा बदलून देताना रंगेहाथ अटक केली आहे. केे. मायकल असे अधिकार्‍याचे नाव आहे. अधिकार्‍याकडून आरोपीकडून 16 लाख रुपयांचा नव्या नोटा जप्त केल्या आहेत.

नोटबंदीनंतर काळापैसा 'व्हाईट' करण्‍याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नोटा बदलून देण्यासाठी बॅंक अधिकार्‍यांनी गोरखधंंदा सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या (ईडी) अधिकार्‍यांनी देशभरात धाड सत्र सुरु केले आहे. आरोपींकडून महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या म्हैसूर शाखेतून हा भामटा नोटा बदलून देत असताना सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. त्याच्यासोबत तिघांना सीबीआयने अटक केली आहे.

93 लाखांच्या नव्या नोटा जप्त...
- दुसर्‍या एका घटनेेत इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या (ईडी) अधिकार्‍यांनी 7 जणांकडून 93 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. सातही आरोपीयंना अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊ न पोलिसांच्या हवाली केले.
- दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका इंजिनियरकडून 5.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी चौकशी करताना अधिकार्‍यांना 93 लाखरुपये एक्स्चेंज केले जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.
- आरोपी 15 ते 35 टक्के कमीशन घेऊन नोटा एक्स्चेंज करण्याचे काम करत होते. आरोपींमध्ये एका बॅंक अधिकार्‍याचा नातेवाईक आहे.
दुसरीकडे, त्याचप्रमाणे नवी मुंबईत 23 लाख तर उल्हासनगरात 10 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्‍यात आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, नवी मुंबईत 23 लाख, उल्हासनगरमध्ये 9.76 लाखांच्या नव्या नोटा जप्त...
बातम्या आणखी आहेत...