आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू प्रसाद यादवांच्या कन्या आणि जावईला ईडीने बजावला समन्स; हजर राहाण्याचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार मीसा भारती - Divya Marathi
खासदार मीसा भारती
पाटणा- बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची थोरली कन्या मीसा भारती यांच्यासह त्यांचे पती शैलेश कुमार यांना समन्स बजावले आहे. ईडीने दोघांना उद्या (मंगळवारी) हजर राहाण्याचे निर्देश दिले आहे. ईडीने मीसा भारती यांच्या दिल्लीतील 3 ठिकाणच्या मालमत्तांवर 8 जुलैला छापा टाकला होता. या कारवाईनंतर ईडीने आता समन्स बजावला आहे.

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या तब्बल 12 ठिकाणच्या मालमत्तांवर सीबीआयने 7 जूनला एकाच वेळी छापे टाकले होते. या धाडसत्राला 24 तास होत नाही तोच मिसा भारती यांच्या दिल्लीतील तीन मालमत्तांवर शनिवारी अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) धाडी टाकल्या.
राज्यसभा खासदार असलेल्या मिसा आणि त्यांचे पती शैलेशकुमार यांच्यावर काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप आहे. बिजवासन, सैनिक फार्म आणि घिटोरनी भागात या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मिसा आणि शैलेश यांची तब्बल सात तास चौकशी केली. दोघांचे मोबाइलही जप्त केले आहेत. सायंकाळी 4 वाजता ईडीचे अधिकारी शैलेश यांना घिटोरनी फार्म हाऊसवरून सैनिक फार्म हाऊसवरून घेऊन गेले. तेथे बंद अवस्थेत असलेल्या काही खोल्यांना शैलेश यांच्यासमोर उघडून तपास करण्यात आला. मिसा आणि शैलेश यांच्यावर काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप आहे. त्यांची मिशेल या कंपनीत चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आली होती. याच पैशांतून दिल्लीत फार्म हाऊस खरेदी करण्यात आले होते. ईडीने या प्रकरणात आधीच बनावट कंपन्यांचे मालक जैन बंधू आणि शैलेश यांचे सीए राजेश अग्रवाल यांना अटक केलेली आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी मिसा यांची 21 जूनला पाच तास चौकशी केली होती. याआधी विभागाने लालूंच्या कुटुंबीयांच्या 12 पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्या होत्या.

मीसा आणि जैन ब्रदर्समध्ये काय आहे कनेक्शन?
शैलेश कुमार व वीरेंद्र जैन यांच्याशी संबंधित 8 हजार कोटींच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात या धाडी होत्या. 90 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. यातील एक कंपनी मिशेल प्रिंटर्स प्रा. लि.मध्ये मिसा व शैलेश कुमार  संचालक होते. 2007-08 मध्ये या कंपनीचे 1.20 लाख शेअर्स 100 रुपयांच्या दराने चार बनावट कंपन्यांनी खरेदी केले होते.
बातम्या आणखी आहेत...