आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबाच्या 700Cr व्यवहारांचा खुलासा करणारी हार्ड डिस्क मिळाली, 4 नपुंसक समर्थक सापडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलात्कार प्रकरणी बाबाला 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. - Divya Marathi
बलात्कार प्रकरणी बाबाला 20 वर्षांची शिक्षा झाली आहे.
सिरसा/चंदीगड - साध्वी बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी सुरु केली आहे. हरियाणा पोलिसांना एक हार्डडिस्क मिळाली आहे, ज्यामध्ये बलात्कारी बाबाची 700 कोटी संपत्ती आणि हवाला व्यवहाराची माहिती आहे. ईडी ही हार्ड डिस्क ताब्यात घेईल. दुसरीकडे, पोलिस रिमांडमध्ये चार असे डेरा समर्थक सापडले आहे ज्यांना डेरामध्ये नपुंसक करण्यात आले होते. यात पंचकुला दंगलीचा मास्टरमाइंडही आहे. राम रहिमला पंचकुलाच्या विशेष न्यायालयाने 25 ऑगस्टला दोषी ठरविले होते. त्यानंतर डेरा समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला त्यात 41 लोक मारले गेले होते. 
 
हार्डडिस्क मध्ये काय सापडले 
- डेऱ्यात टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांना अनेक फाटलेली आणि जळालेली कागदपत्रे सापडली होती. त्यासोबतच एक हार्ड डिस्क मिळाली होती. हार्ड डिस्कही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तिचे फार नुकसान झाले नव्हते. 
- पोलिसांनी हार्ड डिस्क जप्त केली होती. त्यातील डाटा मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये बाबाच्या संपत्ती आणि आर्थिक व्यवहाराची सर्व माहिती आहे. यामध्ये शस्त्रांचीही माहिती आहे. 
 
ईडीची नियमीत चौकशी 
- ईडी कोणत्याही प्रकणाची सुरुवातीला प्राथमिक तपासणी करत असते. याला डिपार्टमेंटच्या गाइडलाइन्सनुसार एफआयआरच्या माहितीवर केलेली चौकशी मानले जाते. ईडीने विविध ठिकाणांहून अनेक कागदपत्र जमा केले आहेत. यामध्ये संपत्तीपासून हवालापर्यंतच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे म्हटले जाते.
 
पंचकुला दंगलीचा मास्टरमाइंडसह चार जणांना केले नपुंसक  
- पंचकुला दंगलीचा मास्टरमाइंडसह चार जणांच्या रिमांडमध्ये समोर आले आहे की त्यांना नंपुसक करण्यात आले होते. त्यांचे मेडिकल रिपोर्ट आणि त्यांच्या जबाबातून हे समोर आले आहे. 
- डेरामध्ये 2000 ते 2005 दरम्यान 400 समर्थकांना नपुंसक केल्याचे प्रकरण समोर आले होते. बाबा त्यांच्या जवळच्या लोकांना नपुंसक करत असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...