आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण हेच वाघिणाचे दुध : शिक्षणासाठी 5 कोटींच्या पॅकेजवर सोडले पाणी या तरुणाने!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर- केवळ 30 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची ऑफर सोडण्याचे धाडस प्रत्येकामध्ये नसते; परंतु छत्तीसगडमधील बिलासपूरच्या विनीत अग्रवालने हे करून दाखवले. एवढेच नाही, तर विनीतने 5 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरीही सोडली. स्वत:मध्ये अधिक विकास करण्याची विनीतची इच्छा होती. त्या इच्छेतून विनीतने हा निर्णय घेतला आहे.
मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी जगात दर्जेदार मानल्या जाणार्‍या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट मॅसाच्युसेट्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये अध्ययनासाठी जाणार आहे. तो अमेरिकेत एमबीएसाठी दोन वर्षे राहणार आहे. विनीत तोरवा येथील व्यवसायिकाचा मुलगा आहे. आयआयटी त्यानंतर आयआयएममधील निवडीपासून त्याच्या शिक्षण आणि यशाचा सिलसिला सुरू झाला. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने गोल्डमॅन या हाँगकाँगमधील कंपनीत 2.25 कोटी रुपयांचे पॅकेजवर नोकरी सुरू केली.