आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effects Of Flood In Local Houses In Uttarakhand Due To Monsoon

केदारनाथमध्ये पसरला डायरिया; प्रशासनाची सामूहिक अंत्यसंस्‍काराची तयारी सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा सर्वाधिक केदार घाटीला झाला आहे. केदारनाथ पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले आहे. ढिगार्‍याखालून काढण्यात आलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यामुळे केदारनाथसह परिसरात डायरियाची साथ पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने सामूहिक अंत्यसंस्कराची तयारी सुरु केली आहे.

सामूहिक अंत्यसंस्कार करण्यासाठी 50 टन लाकूड लागणार आहे. केदारनाथ येथे सोमवारीच सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे ‍निश्चित करण्यात आले होते. परंतु बचाव कार्यात येणार्‍या अडथळ्यामुळे त्याला विलंब होत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

येथील वन निगम संस्थेने जंगलामधून जळाऊ लाकूड व बाजारामधून तूप खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याचे गढवाल जिल्ह्यामधील प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पुढील स्लाइड्‍समध्ये वाचा...'साधूंच्या रुपात चोरट्यांचा धुमाकूळ; मृतदेहावरील दागिनेही लांबविले'