आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Efforts On To Bring Back Bsf Soldier Who Entered Pakistan

वाहून गेलेल्या बीएसएफ जवानाला पाकमध्ये अटक, चौकशीनंतरच येणार भारतात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मूमधील चेनाब नदीत वाहून गेलेला सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान सुरक्षित आहे. सत्यशील यादव असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानात पोहोचला आहे. पाकिस्तान लष्कराने सत्यशील यादवला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला भारताकडे सूपूर्द केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी वृत्त आले होते की, पाकिस्तानात वाहून गेलेला जवान सत्यशील यादव याला अटक झाली आहे. आयएसआय आणि फील्ड इंटेलिजेंस यूनिटच्या (एफआययू) अधिकारी त्याला सियालकोट जवळील आर्मीच्या कॅम्पमध्ये चौकशीसाठी घेवून गेले आहे. बीएसएफचे प्लानिंग, बीएसएफची रणनिती, बीएसएफद्वारा वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबत आयएसआय आणि एफआययूने सत्यशिल यादवला विचारपूस केली होती. एवढेच नव्हे तर भारतीय सीमेवरील लोक पाकिस्तानबाबत काय विचार करतात, हेदेखील विचारण्यात आले होते.

बीएसएफच्या जवानाला परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. बीएसएफच्या एका सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तान रेंजर्सतर्फे एक भारतीय जवान ताब्यात घेण्यात आलेल्या सांगण्यात आले आहे. आम्ही जवानाला भारताच्या हवाले करण्‍यासाठी 'फ्लॅग मीटिंग'ची प्रस्ताव ठेवला होता.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आंतरराष्‍ट्रीय सीमेवरील अखनूर क्षेत्रातून वाहून गेला होता जवान...