आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांपूर्वी असे होते इजिप्त, महिलांना मिनी स्कर्ट वापरण्याचेही होते स्वातंत्र्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इजिप्तच्या अलेक्झांड्रिया पोर्टवर 1959 मध्ये घेण्यात आलेले छायाचित्र.)

इराक, सिरिया आणि येमेन यांच्यासह जवळपास सर्व अरब देश कोणत्या ना कोणत्या संकटाने ग्रासलेले आहेत. इजिप्त हाही त्यांच्यापैकीच एकच देश आहे. येथील राजकीय अस्थिरता कमी झाली असली तरी ओळख मिळवण्यासाठी हा देश झटत आहे. 1950 आणि 1960 च्या दशकात मात्र परिस्थिती अशी नव्हती. इजिप्त हा देश एक अत्याधुनिक अरब देश म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी येथील महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य होते. महिला मिनी स्कर्टपासून सर्व प्रकारचे कपडे परिधान करत होत्या. एवढेच नव्हे तर हॉटेल आणि रिसॉर्टसमध्ये जाण्यापासून बाहेर काम करण्याचे स्वातंत्र्याही त्यांना होते.

कपड्यांपासून त्यांची जीवनशैलीही सध्याच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी होती. असे स्वातंत्र्य प्रदान करण्यात तत्कालीन राष्ट्रपती गमाल अब्देल नसीर यांचे मोठे योगदान होते. त्यांनी समाजवादी आणि आधुनिकतावादी सुधारणांची एक साखळी सुरू केली. पण सामाजिक न्यायाने प्रेरित असलेली त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्णपणे लोकशाहीचा भाग बनू शकली नाही.
गेल्या चाळीस वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कट्टरवाद्यांनी राष्ट्रीयतेच्या नावावर इस्लामला पुढे करत महिलांवर अनेक नियम-कायदे लादले. 1970 च्या दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यानंतर महिलांना हिजाब वापरणे अनिवार्य झाले. या नियम व कायद्यांमुळे सार्वजनिक जीवनान महिलांचा सहभागही कमी झाला.

सध्या इजिप्तमध्ये महिला अनेक बंधने असणारे जीवन जगत असल्या तरी येथील 1950 ते 1960 च्या दशकातील स्थिती वेगळी होती. गेल्या 50 वर्षात आलेला सामाजिक बदल घडवणारी काही छायाचित्रांतून आम्ही मांडणार आहोत.
पुढे पाहा, 1950 ते 1960 च्या कालखंडात कसे होते इजिप्तचे जनजीवन