आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादेत आजपासून आठ दिवस ‘भास्कर उत्सव’; ‘दिव्य भास्कर’च्या यशाची 14 वर्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रँड फिनाले : ११ राज्यांचे ४५१ संगीतकार सादर करतील ‘वंदे मातरम’ - Divya Marathi
ग्रँड फिनाले : ११ राज्यांचे ४५१ संगीतकार सादर करतील ‘वंदे मातरम’
अहमदाबाद- गुजरातमध्ये ‘भास्कर’च्या यशाची ऐतिहासिक १४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘भास्कर उत्सव’ साजरा होत आहे. गुजरातमध्ये दिव्य भास्करचा हा सर्वात मोठा उत्सव ४ ते ११ नोव्हेंबरपर्यंत चालेल. शनिवारी पहिल्या दिवशी अहमदाबादच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये योगगुरू बाबा रामदेव बिझनेस गुरू म्हणून मार्गदर्शन करतील. ते पतंजलीच्या यशाचे रहस्य उलगडतील. आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवात शाहरुख खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, सुखविंदर सिंग, कैलास खेर, शाहिद कपूर, संजीव कपूर, कीर्तिदान गढवी व मायाभाई अहिर यांच्यासह प्रसिद्ध कलाकार भाग घेतील. 
 
या आठ दिवसांत राष्ट्रीय कविसंमेलन, गाण्यासोबत भोजनाचा आस्वाद, गुजराती लोक डायरासह अनेक कार्यक्रम असतील. ११ नोव्हेंबरला सरदार पटेल स्टेडियमवर ग्रँड फिनाले होईल. यामध्ये कल्याणजी-आनंदजी संचालित ११ राज्यांतील ४५१ संगीतकार ७४  वाद्यांसह वंदे मातरम सिम्फनी सादर करतील. या दिवशी सुखविंदर सिंगही देशभक्तीची गीते सादर करतील. शाहरुख, रणवीर, दीपिकाही कार्यक्रमात सादरीकरण करतील.  
बातम्या आणखी आहेत...