आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रप्रदेश : ट्रक-एसयुव्ही समोरासमोर अपघातात आठ जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकवर एसयुव्ही कार धडकल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे नेल्लूर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसयुव्ही कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी समोरुन येणा-या ट्रकवर आदळली. कारमधील प्रवासी एका धार्मिक कार्यक्रामासाठी नेल्लूरला आले होते. नेल्लूरचे पोलिस उपाधिक्षक के. बाला वेंकटेश्वरा राव यांनी सांगितले की, अपघात एवढा भीषण होता की, सहाजण जागेवरच ठार झाले तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातातील जखमी आणि मृत हे कडापा जिल्ह्यातील आहेत.