आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वितरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद- उत्तर प्रदेश सरकारकडून सोमवारी आठ हजार शालेय विद्यार्थ्यांना लॅपटॉपची भेट देण्यात आली. शैक्षणिक मोफत योजने अंतर्गत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गाझियाबाद जिल्ह्यात त्याचे वितरण करण्यात आले. गौतम बुद्ध नगर येथील विद्यार्थ्यांना या लॅपटॉपचे मोफत वितरण करण्यात आले. सरकारने ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील दरी कमी करण्यासाठी ही कल्याणकारी योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी तंत्रज्ञानापर्यंत पोहचू शकणार आहेत, असे अखिलेश यादव म्हणाले. कमला नेहरू नगर मैदानावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, लॅपटॉपच्या मदतीने विद्यार्थी जेव्हा चांगली प्रगती करतील.