आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 गावांत बिनाफटाक्यांची दिवाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरोद- इरोद जिल्ह्यातील पक्षी अभयारण्यानजीकच्या आठ गावांतील नागरिकांनी सलग चौदाव्या वर्षी एकही फटाका न फोडता दिवाळीचा सण साजरा केला. येलोदे पक्षी अभयारण्याजवळ 750 कुटंबे राहतात. अभयारण्यात ऑक्टोबर-जानेवारी महिन्यात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. गावापासून केवळ 2 कि.मी. अंतरावरच हे अभयारण्य आहे. फटाक्यांमुळे पक्ष्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, त्यामुळे आठ गावांतील लोकांनी फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती 70 वर्षीय मनिक्कम या रहिवाशाने दिली.

गावातील अन्य समारंभावेळी फटाक्यांचा वापर केला जात नाही. दिवाळीदिवशी आम्ही नवे कपडे घालून कुटुंबीयांसह पक्षी अभयारण्याला भेट देतो. तिथे गेल्यानंतर पक्ष्यांना दाणे भरवतो, असे अन्य एका ग्रामस्थाने सांगितले. साधारण 2000 लोकांनी शनिवारी अभयारण्याला भेट दिल्याचे वन विभागाच्या कर्मचार्‍याने सांगितले.