आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Womens Dead In Bilaspur For Family Planning Operation

टार्गेट पूर्ण करण्यासाठी 83 महिलांची तडकाफडकी \'नसबंदी\', 8 ठार 32 गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः प्रकृती बिघडल्यानंतर बिलासपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आलेल्या महिला)

बिलासपूर- छत्तीसगडमध्ये आरोग्य विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा जगजाहीर झाला आहे. कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे टार्गेट पूर्ण करण्‍यासाठी एका शिबिरात वैद्यकीय अधिकार्‍यांनी काही तासांत 83 महिलांचे तातडीने शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलांना घरी सोडण्यात आले. मात्र, काही तासांतच महिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा बिलासपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना आठ महिलांचा मृत्यु झाला. तसेच 32 महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैदकीय सूत्रांनी दिली आहे.
ब‍िलासपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेमीचंद रुग्णालयात शनिवारी (8 नोव्हेंबर) एका शिबिर घेण्यात आले होते. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमार्तंगत वैद्यकीय अधिकार्‍यांना आयोग्य विभागाद्वारा टार्गेटही देण्यात आले होते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी नेमीचंद रुग्णालयात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयाचे डॉ. आर.के. गुप्ता, डॉ.के.के. ध्रुव, डॉ.निखटा यांनी दूर्बिनच्या साह्याने शस्त्रक्रिया करून काही तासांतच महिला रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. चारही डॉक्टरांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

महिला घरी पोहोचल्यानंतर एका पाठोपाठ जवळपास सर्वच महिलांची प्रकृती अचानक बिघडली. बहुतेक महिलांना उलट्या होत होत्या. महिलांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना सोमवारी जिल्हा रुग्णालय आणि सिम्समध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आठ महिलांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे.

शनिवारी आयोज‍ित शिबिरात 83 महिलांवर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. जिल्हा, सिम्स आणि अपोलो रुग्णालयात सद्या 56 महिलांवर उपचार सुरु असून त्या पैकी 32 महिलांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्यातील सर्व कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया शिबिर रद्द करण्‍यात आले आहे.
मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांनी दिले चौकशीचे आदेश...
मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्‍यात आली आहे. तसेच डॉ.रमण सिंह बिलासपूरकडे रवाना झाले आहेत.
प्रत्येक मृत महिलांच्या वारसांना 4-4 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर प्रकृती असलेल्या महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.
सोमवारी रात्री उशीरा राज्याचे आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांनी रुग्णालयाला भेट देऊन रूग्ण महिलांची विचारपूस केली. रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांना घेराव घातला होता. आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाविषयी उत्तर मा‍गितले.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, बहुतेक महिलांची प्रकृती गंभीर...