आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caught On CCTV: Man Lures 8 Year Old Girl Into Parking Shed, Rapes Murders Her Caught On CCTV: Man Lures 8 year old Girl Into Parking Shed, Rapes murders Her

कर्नाटकात बलात्कारानंतर 8 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नराधम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- कर्नाटकातील बंगळुरुपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या होसकोटे शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. होसकोटे येथील वीट भट्टीच्या कार शेडमध्ये एका आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाली. गुरुवारी (4 फेब्रुवारी) सायंकाळी ही मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या तोंडात पॉलिथीन बॅग कोंबल्या होत्या.
मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्‍यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बलात्कार आणि हत्याकांडाची घटना वीट भट्टीसमोरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 40 वर्षीय नराधम दिसत आहे. कार शेडबाहेर खेळत असलेल्या एका मुलीला हा व्यक्त‍ी कार शेडमध्ये घेऊन जाताना स्पष्ट दिसले आहे. काही वेळेनंतर तोच व्यक्ती कार शेडमधून बाहेर निघताना दिसले आहे. पोलिस नराधमाचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन नराधमाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती होसकोटेचे एससी अब्दुल अहद यांनी सांगितले आहे. दरम्यान, पीडितेचे आई-वडील उत्तर कर्नाटकातील रहिवासी आहेत. गेल्या एक वर्षापासून होसकोटे येथील वीट भट्टीत ते काम करत आहेत.