आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनपिंग यांच्यासोबत चर्चा यशस्वी : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - ब्रिक्स या पाच देशांच्या संघटनेच्या संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. चर्चा यशस्वी ठरल्याचे बैठकीनंतर मोदी यांनी स्पष्ट केले.
उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याशिवाय चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांनी भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. डोभाल यांनी जिएची यांच्याशी जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी जाहीर करण्यातील चीनच्या अडथळ्यावर नाराजी दर्शवली. चीनने चर्चेच्या सुरुवातीला एनएसजीच्या मुद्द्यावर सकारात्मक संकेत दिले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर उभय नेत्यांनी एकत्रित लढण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. परंतु या मुद्द्यावर राजकीय लाभ घेण्याच्या विरोधात असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. चर्चेमुळे दोन्ही देशात संवाद वाढणार आहे.
फोटोग्राफरला ढकलून केले बाजूला
तत्पूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग विमानातून उतरले. चीनचे फोटोग्राफर त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी आले असता त्यांना विमानाच्या शिडीवर बाजूला करण्यात आले. भारतीय सुरक्षा दलाने त्यांना खेचले. त्यानंतरही फोटोग्राफर विमानाच्या शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत होते. या गोंधळात राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना स्वागतासाठी जिनपिंग यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचण आली.
बातम्या आणखी आहेत...