आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरु : स्फोटामुळे 4 इमारती कोसळल्या, 7 जणांचा मृत्यू; अनाथ मुलीला सरकार घेणार दत्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने बिल्डिंग पडल्याचे सांगितले जात आहे. - Divya Marathi
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने बिल्डिंग पडल्याचे सांगितले जात आहे.
बंगळुरु - येथील एजिपूरा भागात सोमवारी एक स्फोट झाला त्यात 4 घरे कोसळली. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका जोडप्याच्या मुलीला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. राज्य सरकारने या बालिकेला दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका बिल्डिंगमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. तर, सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे, की तिथे असलेल्या सिलिंडरमध्ये गॅस नव्हता. मात्र, एलपीजी सिलिंडरचाच हा स्फोट असल्याचे मानले जात आहे. 
 
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 
- एका दुमजली इमारतमध्ये स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आसपासचे तीन घर या स्फोटामुळे कोसळले. 
- ज्या बिल्डिंगमध्ये स्फोट झाला त्याच बिल्डिंगमधील 5 जणांचा स्फोटात मृत्यू झाला आहे. 
- बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिकारा उपसण्याचे आणि त्याखाली दबलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याच प्रयत्न सुरु आहेत. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
- ढिगाऱ्याखालून एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. तिला सरकार दत्तक घेणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री के.जे. जॉर्ज यांनी केली आहे. 
 
मृतांच्या नातेवाईकांना 5-5 लाखांची मदत 
- मंत्री के.जे. जॉर्ज यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्याशिवाय दुर्घटनेतील जखमींना 50-50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...