आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या म्हातारीची स्टोरी डोक्याला आणेल झिणझिण्या, म्हणाल- असले पोरं नकोच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोराखपूर (उत्तर प्रदेश)- 102 वर्षांच्या या म्हातारीची स्टोरी वाचली तर तुम्ही खरोखरी सुन्न व्हाल, डोक्याला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत. यापेक्षा पोरं नकोच, असे म्हणाल. नऊ महिने पोटात ठेवले, अंगाखांद्यावर खेळवले त्या पोटच्या पोरानेच या म्हातारीला मृत्यूच्या दाढेत ढकलले. त्याचे झाले असे, की या म्हातारीच्या पायाला जखम झाली आहे. वेळीच उपचार न केल्याने त्याचे गॅंगरीन झाले आहे. भावाकडे उपचारासाठी सोडतो असे सांगून तिचा मुलगा तिला गोरखपुरला घेऊन आला. त्यानंतर तिला स्टेशनवरच सोडून निघून गेला. एवढेच नव्हे तर तिची आयुष्यभराची जमापुंजी चार हजार रुपयेही लुटून नेले.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- या म्हातारीचे नाव गुलशनबाई आहे. काही वर्षांपूर्वी तिचा पती नूर खानचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये ती मोठा मुलगा सलिमसोबत राहत होती.
- काही महिन्यांपूर्वी तिच्या पायाला एक फोड झाला. त्याकडे लक्ष न दिल्याने त्यात इन्फेक्शन झाले. जरा वेळात त्याचे गॅंगरीन झाले.
- उपचारासाठी तु्ला छोटा मुलगा चांदजवळ कानपुरला सोडतो असे सांगून सलिम तिला घेऊन गोरखपूर स्टेशनवर आला.
- अवध एक्सप्रेसने दोघे कानपुरला जात होते. पण मध्येच गोरखपुरला उतरले. त्यानंतर तिला स्टेशनवरच सोडून सलिमने पोबारा केला.
- जाताना त्याने गुलशनबाईजवळचे चार हजार रुपयेही नेले. आता भीक मागण्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरला नाही.
रोटी बॅंक स्वयंसेवकांनी केली मदत
- पाच दिवस गोरखपूर रेल्वे स्टेशनवर गुलशनबाई राहिली. लोकांनी दिलेले खाद्यपदार्थ खावून ती जीवंत राहिली.
- या दरम्यान रोटी बॅंकेचे स्वयंसेवक आझाद पांडे आणि गौरव यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
- गुलशनबाईजवळ एक मोबाईल नंबर होता. त्यावर त्यांनी फोन केला तेव्हा मोठ्या मुलीच्या मुलाने फोन उचलला.
- त्याने स्वयंसेवकांना विनंती केली की आग्रा कॅंटोनमेंट रेल्वे स्टेशनला म्हातारीला पाठवून द्या. आम्ही तिला तेथून रिसिव्ह करतो.
- सध्या रोटी बॅंकेचे कमर्चारी तिची देखभाल करत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या दुर्दैवी म्हातारीचे फोटो.... अखंच यामुळेच म्हणतात असे पोरं नको ग बाई.....
बातम्या आणखी आहेत...