आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको द्या, मत घ्या; उपवरांचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंद - लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसमोर हरियाणाच्या उपवर मतदारांनी बायको द्या, मत घ्या असा अजब प्रस्ताव ठेवला आहे. देशात हरियाणामध्ये स्त्री-पुरुष जन्मदरात सर्वाधिक तफावत आहे. त्यामुळे उपवर तरुणांना मुली मिळणे जिकिरीचे झाले आहे. 2011 च्या जनगणनेप्रमाणे हरियाणात 1000 पुरुषांमागे 879 स्त्रिया आहेत. रोहतक येथील लोकसभा उमेदवार शमशेर खारकारा यांच्या पत्नी राधा राणी यांच्या मते, ‘स्त्री भ्रूणहत्या हा निवडणुकीचा मुद्दाच नाही. ती एक सामाजिक समस्या आहे, त्यात राजकारणाचा संबंध नाही. ’ बीबीपूर ग्रामपंचायतीचे प्रमुख सुनील जगलान यांनी ‘अविवाहित पुरुष संघटना’ स्थापन केली आहे. मात्र या गावात आतापर्यंत आम आदमी पार्टीचा उमेदवार वगळता कोणीही फिरकले नसल्याचे जगलान यांचे म्हणणे आहे. संघटना लैंगिक विषमता,स्त्री भ्रूणहत्या आदी समस्यांवर काम करते. त्यांनी या माध्यमातून उमेवारांकडे वधू संशोधनाचा प्रस्ताव ठेवला आहे. या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास , भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असे संघटक जगलान यांनी सांगितले. मतदारांनी दिलेल्या घोषणेचा अर्थ सर्वच तरुणांचे यंदा कर्तव्य आहे, असा होत नाही. या निमित्ताने राजकीय पक्षांना येथील समस्येची ओळख करून देण्याचा उद्देश आहे, असे जगलान यांनी स्पष्ट केले.
2011 च्या जनगणनेनुसार हरियाणामध्ये 1000 पुरुषांमागे 879 स्त्रियांचे प्रमाण आहे. यंदा शुभमंगल करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांनी लग्नासाठी मुली द्या, मत देतो, (बहू दिलाओ,व्होट पाओ) अशी अटच घातली आहे.