आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांचे जीवन सुसह्य करणार : सुप्रियो महिनाभरात हिंदी बोलू लागेन : डोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसनसोल -आसनसोल. देशातील कोळसा उत्खननाची जन्मभूमी. वेगाने वाढणार्‍या शहरांमध्ये देशात 11 व्या क्रमांकावर. परंतु तुम्ही शहरात फिराल, तर धुळीने माखलेले रस्ते व घाणीने बरबटलेले बाजार दिसतील. कोणाशीही बोलू लागले तरी ताबडतोब पाणीटंचाईचा विषय छेडला जाईल. त्यामुळेच भाजप उमेदवार व गायक बाबुल सुप्रियोने नवे वाक्य सुरू केले आहे, ‘आसनसोल में ज़िंदगी नहीं आसान’ आपल्या प्रचारात ते लोकांचे जीवन सुसह्य करण्याची गोष्ट करतात. मतांसाठी ते नया हाट व मुन्शी बाजारच्या चिंचोळ्या गल्ल्या पायी फिरत आहेत. आपल्यासोबत लोकांची गर्दी पाहून बोलले, ‘तुम्ही योग्य मार्गावर (भाजपच्या) चालला आहात. दिल्ली आणि आसनसोलदरम्यान हॉटलाइन गरजेची आहे. तरच येथील विकास होईल. या हॉटलाइनचे काम मी करीन.’ भाषण संपताच एक कार्यकर्ता आग्रह करतो, ‘बाबुलदा, एक गाणं प्लीज!’ ते पुन्हा माइक हातात घेतात. गुणगुणतात, ‘साँसों को साँसों में ढलने दो ज़रा. लम्हों की गुजारीश है ये.!’ प्रचारादरम्यान चहापत्तीचे व्यापारी विनोदकुमार भालोरिया रोडकडे इशारा करून म्हणतात, हा कचर्‍याचा ढीग पाहताय ना? रोज हीच स्थिती असते. पूर्वी माकपला जिंकवत राहिलो, अडीच वर्षांत तृणमूल पाहिले, पण दशा सुधारली नाही. या वेळी भाजपला पाहूयात.

आसनसोलच्या लोकसंख्येत सुमारे 60 टक्के हिंदी भाषिक आहेत. त्यांना वळवण्याचे प्रयत्न सगळेच करत आहेत. तृणमूलच्या उमेदवार डोला सेनसुद्धा याच प्रयत्नात आहेत. काली पहाडीमध्ये त्यांची सभा आहे. हिंदी बोलण्याची पद्धत पहा. ‘माफ करना हम सही ढंग से हिंदी में बात नहीं कर सकती. समझो हम एमपी (खासदार) बन गये. 16 जून तक का वक्त दीजिए. रिजल्ट लगने से पहले एक हफ्ता के अंदर हिंदी बोलना सीख लेंगे.’ डोला सेन कोलकात्याच्या आहेत आणि कामगार संघटनेच्या नेत्याच्या रूपाने त्यांची ओळख आहे. ममतांसोबत आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे. पक्ष कार्यकर्ते त्यांनी दीदीच्या (ममता बॅनर्जी) प्रतिनिधीच्या रूपात प्रचारित करत आहेत. डोला देखील फक्त दीदींच्या नावाने मते मागत आहेत.

राजकारणात येऊन मी ही जोखीम घेतली आहे.
21 वर्षांपूर्वी जेव्हा मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची नोकरी सोडून गायनाच्या क्षेत्रात आलो, तेव्हा घरचे सर्व नाराज होते. आता राजकारणात येण्याच्या निर्णयाला रिस्की म्हणतात. माझ्यासाठी जोखीम आहे, परंतु मी योग्य वेळी, योग्य टीम व योग्य कप्तानाशी जोडला गेलो आहे. -बाबुल सुप्रियो
सेलचे दोन मोठे प्लांट, रेल्वे इंजिन कारखाना, तरीही अजून आसनसोल जिल्हा झाला नाही
आसनसोल लोकसभा मतदारसंघात भारतीय पोलाद प्राधिकरणाचे (सेल) दोन प्रकल्प आहेत. येथे इस्टर्न कोलफिल्ड्सचे मुख्यालय आहे. चित्तरंजनमध्ये रेल्वे इंजिन बनतात. तरीही आसनसोल अजून जिल्हा झालेला नाही. भाजप हा मुद्दाही उचलत आहे. आसनसोल बद्र्वान जिल्ह्यात मोडतो.
छायाचित्र - बाबुल सुप्रियो भले नेता बनण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु लोक त्यांच्याकडे गाण्याची फर्माइश करूनच टाकतात.