आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिले मुलायम, कांशीराम.. हवा हो गये जय श्रीराम' या घोषणांनी बदलली निवडणुकांची दिशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या संपूर्ण देशामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा फिव्हर आहे. भारतीय निवडणुकांमध्ये घोषणांना मोठे महत्त्व आहे. नरेंद्र मोदींनी अबकी बार मोदी सरकार... या एका घोषणेच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर लोकांना आकर्षिक करण्यात यश मिळवले. अशाच काही घोषणांच्या माध्यमातून आजवर लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेस, जनसंघ (आताचे भाजप), समाजवादी पक्ष सळ्याच पक्षांनी एकमेकांच्या विरोधात आणि एकमेकांना हिणवणाऱ्या अशा घोषणा दिलेल्या आहेत.
 
भारतात निवडणुका असतात तेव्हा पूर्णपणे सगळीकडचे वातावरण बदलून गेलेले असते. प्रचाराच्या वेळी तर निरनिराळ्या पक्षांचे झेंडे, होर्डींग, पोस्टर्स यांनीच सगळी जागा व्यापलेली असते. पण प्रचारामध्ये तेवढीच महत्त्वाची असते ही राजकीय पक्षांची घोषणा. या घोषणांच्या माध्यमातून राजकीय पक्ष घराघरात पोहोतच असतात. आजच्या अनेक माध्यमांनी व्यापलेल्या जगात तर या घोषणा विविध पद्धतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील अशी सोय केली जाते.
 
राजकीय पक्ष अनेक मोठी मोठी आश्वासने देत असतात. प्रचारामध्ये एका खास कँपेनसह ते एका खास घोषणेचा वापर करत असतात. राजकीय पक्षांच्या जनसंपर्काचे काम करणाऱ्या पीआर कंपन्या या स्लोगनसाठी खास मेहनत घेत असतात. लोकांवर या घोषणेचा मारा कसा करता येईल याचा सर्व पद्धतीने अभ्यास केला जातो. प्रत्येक पक्ष वेगळा काहीतरी विचार करून ही घोषणा तयार करत असतात. इतिहासातील अशाच काही गाजलेल्या घोषणा आपण आज पाहणार आहोत.
 
पुढील स्लाइड्वर पाहा, अशाच काही घोषणा आणि जाणून घ्या त्यांच्याबाबत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...