आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कोसळून तीन बालके दगावली, तीन जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाराबंकी- येथून जवळच असलेल्या सात्रिख  परिसरात वीज कोसळून तीन बालके दगावली, तर काही जण जखमी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमदपूर गावात गाईंना घेऊन परतत असताना काही लोकांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अनिलकुमार कनोजिया (१६), अभिषेक (१२) आणि हेमा (११) ही मुले ठार झाली. छबीनाथ, शिवप्रकाश आणि बबलू ही मुले गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्हा दंडाधिकारी अखिलेश तिवारी यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...