आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर साप, सापळ्यांनी घेरलेल्या 100 फुटी वाळूच्या टेकड्यांवर प्रथमच वीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्ही पाकिस्तानी सीमेपासून दोन किमी दूर शाहगड चौकीत उभे आहोत. बीएसएफकडून विशेष परवानगी घेतल्यानंतर आम्ही येथे पोहोचलो. सीमेवरील ज्या भागात प्रथमच वीज पोहोचली तो भाग पाहण्याची तयारी सुरू आहे. हा भाग एवढा दुर्गम आहे की, सामान्य माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. तेथे जाण्यासाठी आम्ही रात्री १० वाजता बीएसएफच्या जिप्सी जीपमध्ये बसलो. थोडे दूर गेल्यावर रस्ता ए‌वढा खराब आहे की, पुढील प्रवास उंटावर करण्याचे ठरले. कुंपणापर्यंत जाण्यासाठी. वादळी वाऱ्यात उडणारी वाळू आणि जबरदस्त ऊन तर आहेच, शिवाय प्रत्येक पावलावर साप आणि विंचवांचा धोका आहे. आमच्यासोबत आलेल्या जवानाने सांगितले की, वाळूत आढळणाऱ्या सापाला स्थानिक भाषेत पिवणा म्हणतात. हे साप एक-दीड फुटाचेच असतात, पण त्यांनी दंश केला की माणूस लगेच मरतो. चर्चा सुरू असतानाच आम्ही कुंपणाजवळ पोहोचलो. बीएसएफचा अभियांत्रिकी विभाग सीमा प्रकाशमान करत असल्याचे आम्हाला दिसले.  

राजस्थानच्या जेसलमेरला लागून असलेले पश्चिम सीमेवरील या ३० किमी भागात पहिल्यांदाच वीज पोहोचत आहे. हा भाग पूर्णपणे अंधारात होता. त्याचे कारण म्हणजे या दुर्गम भागातील वाळूच्या टेकड्या. सुमारे ९० ते १०० फुटांपर्यंतच्या या टेकड्या एवढ्या धोकादायक आहेत की, त्या रात्रीतून आपली जागा बदलतात. त्यामुळे कुंपणही गायब होते. सीमेच्या ओळखीच्या सर्व खुणा या टेकड्यांत गायब होतात. कच्चे रस्ते, सिमेंटचे खांब, कुंपणाचे खांब, १०-१० मीटर खोल आणि उंच लोखंडी अँगल वाळूत बुडतात. या दुर्गम भागात पोहोचणे खूप कठीण आहे. तेथे लष्करी वाहन पोहोचत नाही आणि पायीही जाणे कठीण आहे. जिप्सीही रस्ता सोडून पुढे जात नाही. पायी चालल्यास गुडघ्यापर्यंत रुततात.  

सीपीडब्ल्यूडीने ही सीमा प्रकाशमान करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. एका खासगी संस्थेने आयआयटी दिल्लीसोबत सर्व्हे केला, पण त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे बऱ्याच प्रयत्नांनंतर आता प्रथमच बीएसएफच्या राजस्थान फ्रंटियरने नवे पाऊल उचलले आहे. तेथे कुंपणाच्या खांबांवरच सौर पॅनल लावलेले खांब लावले जात आहेत. त्यामुळे सीमेचा हा भाग प्रथमच प्रकाशमान झाला आहे. लवकरच पूर्ण भागात वीज पोहोचेल. सध्या हा प्रकल्प सुरू आहे. बीएसएफ राजस्थान फ्रंटियरचे आयजी अनिल पालीवाल यांनी सांगितले की, सध्या इंटिग्रेटेड सौर दिवे लावले आहेत. त्यावर २४ वॅटचे एलईडी आहेत. तेथे स्थायी लायटिंगसाठी सीपीडब्ल्यूडी सर्वेक्षण करत आहे. पश्चिम बंगाल पोलिसचे एडीजी आणि राजस्थान फ्रंटियरमध्ये आयजी राहिलेले डॉ. बी. आर. मेघवाल म्हणाले की, या भागातील सर्वात मोठी अडचण म्हणजे वाळूच्या टेकड्या. त्याच्यावर कायमचा उपाय सापडला नाही. आम्ही अनेकदा तार लावली, पण त्या वाळूत दबतात.  

दोन वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेनेही सर्व्हे केला होता. वाळूच्या कणांची घनता किती आहेे, ती एवढी का उडते, पाणी किती खोल आह, वीज कशी पोहोचवली जाऊ शकते, अशा १०० मुद्द्यांवर सर्व्हे झाला होता. दुसरीकडे संपूर्ण राजस्थानच्या सीमेवर आधीच लावलेले सोनेरी फ्लड लाइट बदलले जातील. तेथे सोडियम दिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. आता गृह मंत्रालय एलईडी दिवे लावत आहेत.

सध्या राजस्थान सीमेच्या ८०० किमी अंतरात ७,८९० खांबांवर ३१ हजार ५६० लाइट लावले आहेत. एका खांबावर चार सोडियम दिवे आहेत. एका तासात एका खांबावर १२ तासांत सरासरी १२ युनिट वीज खर्च होते.  एलईडी लावल्याने सुमारे ५५ टक्के वीज कमी लागेल आणि दरमहा १.१० कोटी रुपयांची बचत होईल. एलईडी लावण्याचे काम १० टप्प्यांत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात ८६ किमी भागात दिवे बदलले जात आहेत.  

येथे तैनात जवानही होतात बेपत्ता  
हा भाग खूप धोकादायक आहे. राजस्थानच्या सीमेवर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला कुंपण आणि फ्लड लाइट लावण्याचे काम सुरू झाले होते. ते १९९६ मध्ये पूर्ण झाले होते. पण काही भागांत अजूनही लाइट नाहीत. जैसलमेरचा हा भाग त्यापैकीच. जवान सांगतात की, १९६५मध्ये कुंपणही नव्हते. त्यामुळे जवान टेकड्यांमध्ये रस्ता चुकत असत आणि पाकिस्तानमध्ये जात असत. डॉ. मेघवाल यांनी सांगितले की, कुंपण होण्याआधी येथे काही जवानांचा मृत्यूही झाला आहे. अनोळखी व्यक्तींचे सापळेही मिळाले होते. 
बातम्या आणखी आहेत...