आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातील पॉवर हाऊस अरुणाचलात वीजटंचाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर - देशाचे भविष्यातील पॉवर हाऊस समजल्या जाणार्‍या अरुणाचल प्रदेशात दोन-अडीच महिन्यांपासून भीषण वीजटंचाई निर्माण झाली आहे. या राज्यातील जलविद्युत प्रकल्पाद्वारे 58 हजार मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातो.
राज्यातील नद्या आटत चालल्याने ईशान्य राज्यांसह अरुणाचल प्रदेशात वीजटंचाई निर्माण झाली आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी अभ्यासासाठी दिवा व मेणबत्तीचा वापर करत आहेत. राज्याला मागणीच्या कालावधीत 84 मेगावॅट तर कमी मागणीच्या काळात 34 मेगावॅट वीजपुरवठा होतो. जास्त मागणीच्या वेळेत 130 मेगावॅट विजेची गरज आहे. ईशान्य ग्रीडकडून जास्त मागणीच्या काळात 44 ते 84 मेगावॅट तर कमी मागणीच्या काळात 34 ते 44 मेगावॅट वीजपुरवठा होतो, असे राज्य वीज वितरण विभागाचे (एसएलडीसी) अधीक्षक अभियंता टी. मिझ यांनी सांगितले. ग्रिडमार्फतच्या वीजपुरवठ्याची माहिती एसएलडीसीकडे उपलब्ध नाही, असे मिझ म्हणाले.