आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगली हत्तींची झुंड चित्कार करत मैदानात घुसली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुरकेला - ओडिशातील बिसरा मैदानाने एकेकाळी दिवंगत इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अशा पाहुण्यांची हजेरी पाहिली आहे. परंतु शनिवारी मात्र मैदान परिसरात थरार निर्माण झाला होता. त्याला कारण ठरले हत्तीच्या झुंडीचे आक्रमण !

गेल्या दोन दिवसांपासून अकरा जंगली हत्तींनी बिसरा मैदानाजवळील बिसरा पुनर्वसन कॉलनी (आरएस) भागात मुक्काम ठोकला आहे. त्यात सहा मादी, दोन नर व तीन पिलांचा समावेश आहे. हत्तींनी अद्याप कोणाला इजा केल्याची माहिती नाही. परंतु या जंगली हत्तींनी मारलेल्या मुसंडीत एक भिंत कोसळली. रिक्षासह काही वाहनांचे नुकसानही केले.

शांत ठेवण्यासाठी केळी-आंब्याची मेजवानी
हत्तींनी प्रवेश करताच मैदानाची दारे तत्काळ बंद करण्यात आली. जंगली हत्ती दिवसा कोठेही स्थलांतर करण्याचे टाळतात. त्यामुळे आम्ही सुदैवी ठरलो. म्हणून दारे लावता आली. नंतर वन विभागाने त्यांच्या दिशेने बाहेरून केळी, आंबे भिरकावले. आंब्याच्या मोठा फांद्या व केळीची झाडे हत्तींसाठी आणण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे स्थलांतर करण्याची योजना आखली, अशी माहिती जिल्हा वन अधिकारी एस. कुमार यांनी दिली.