आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘वृक्ष कोसळल्यावर धरणीकंप ’ काँग्रेसच्या ट्विटवर नवा वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने त्यांचे एक वादग्रस्त विधान ट्विट करून नवा वाद आेढवून घेतला आहे. राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण करताना पश्चिम बंगाल शाखेने एक पोस्ट ट्विट केली आहे. मोठा वृक्ष कोसळतो. तेव्हा धरती कंपायमान होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. परंतु वाद वाढल्याचे पाहताच ते ट्विट डिलिट करण्यात आले.

प्रदेश शाखेचे अकाउंट हॅक झाले होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे १९८४ आई व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भडकलेल्या शीख विरोधी दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी यांनी हे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य नव्याने जाहीरपणे मांडल्यावरून विरोधी पक्षांनीदेखील कडक प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी स्क्रिन शॉट शेअर करून ही कृती चुकीची आहे, असे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, काँग्रेसचे लोक कसे संवेदनाहीन आहेत, हेच यावरून दिसून आले आहे. आप नेते एच.एस. फुलका म्हणाले, हे ट्विट काँग्रेसची मानसिकता दर्शवणारे आहे. पश्चिम बंगाल काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा कट करण्यात आला आहे. त्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची परिस्थिती वेगळी होती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला त्याचवेळी वेगळ्या पद्धतीने वापरल्याचा आरोपही विरोधकांकडून नेहमी केला जातो. वास्तविक सामाजिक भान ठेवून सत्ताधारी पक्षाने वागावे, अशी अपेक्षा असताना तसे कधीही दिसले नाही. आता काँग्रेसकडे सत्ताही नाही. त्यामुळे ते बेताल झाल्याचा आरोप भाजपच्या गोटातून केला जातो.
बातम्या आणखी आहेत...