आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emilie Kept In Touch With Netajis Family Even After Disappearance

पत्नीसोबत दोन वर्षे राहिले होते नेताजी, फाइल्समधून उलगडले रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चि बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकारने शुक्रवारी नेताजींच्या संबंधीत फाइल्स सार्वजनिक केल्या - Divya Marathi
पश्चि बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकारने शुक्रवारी नेताजींच्या संबंधीत फाइल्स सार्वजनिक केल्या
कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधीत 64 फाइल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सार्वजनिक केल्या. या कागदपत्रातून लक्षात येते, की नेताजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांची पत्नी एमिली शेंकली त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होती. पत्रांच्या माध्यमातून त्यांच्यात बोलणे होत होते. यात नेताजींच्या कन्या अनिता यांचादेखील अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
एमिली यांना आशा असते की एक दिवस नेताजी परत येतील. या फाइल्समधून उलगडलेले नेताजी आणि एमिली यांच्या नात्यावर एक नजर...

एमिलीची भेट आणि लग्न
4 मे 1946 च्या कोलकाता (तत्कालिन कलकत्ता) पोलिस सेक्य्यूरिटी कंट्रोलच्या साप्ताहिक सर्व्हेमध्ये एमिली यांचा उल्लेख एक अशी महिला जी स्वतःला नेताजींची पत्नी सांगते असा करण्यात आला आहे. या कागतपत्रांनूसार, नेताजी आणि एमिली यांची भेट बर्लिनमध्ये 1941 साली झाली 1942 पर्यंत ते सोबत राहिले. नेताजींनी एमिलाला प्रपोज केले. जानेवारी 1942 मध्ये त्यांनी लग्न केले. 29 नोव्हेंबर 1942 रोजी त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव अनिता ठेवण्यात आले. त्यानंतर एमिली व्हिएन्नाला परत गेली.

लग्नाची नोंद नाही
नेताजी आणि एमिली यांच्या लग्नाची कायदेशिर नोंद करण्यात आलेली नाही. त्याचे कारण जर्मनीमध्ये विदेशी नागरिकासोबत लग्न करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांचे लग्न नोंदणीकृत झाले नाही. मात्र एमिली यांचा दावा होता की त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.

पत्नीला सांगितले होते, हे पत्र माझ्या भावाला दे
व्हिएन्ना सोडताना नेताजींनी त्यांचे बंधु शरतचंद्र बोस यांच्या नावे एक पत्र दिले होते. एमिली यांच्याकडे ते पत्र देताना नेताजी म्हणाले होते, जर मला काही झाले तर या फोटोग्राफ्ससोबत हे पत्र माझ्या भावापर्यंत पोहोचव.

मुलगी चार आठवड्यांची असताना झाली होती शेवटची भेट
नेताजींनी त्यांच्या मुलीला शेवटचे पाहिले तेव्हा ती चार आठवड्यांची होती. 1943 मध्ये त्यांना पुन्हा एकदा व्हिएन्नाला जायचे होते, मात्र तसे घडले नाही. त्यानंतर ते गायब झाले होते.

नेताजींच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर लिहिले पत्र
एमिली यांना नेताजींच्या मृत्यूची माहिती 1945 मध्ये मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नेताजींच्या कुटुंबियांना एक पत्र लिहिले. हे पत्र देखील कोलकाता पोलिसांच्या गुप्तहेर खात्याने आपल्या ताब्यात घेतले होते. या पत्रात एमिली यांनी लिहिले होते, मला नेताजींच्या कुटुंबाकडून मालमत्ता नको आहे. पत्राच्या शेवटी लिहिले होते, नेताजींच्या मृत्यूची बातमी ऐकून मला 'धक्का' बसला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेताजींच्या संबंधीत फाइल्स पाहाण्याची उत्सूकता