आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दुबईत विमान कोसळल्यावर लगेच उतरण्याऐवजी लॅपटॉप, बॅग शोधत होते प्रवासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - केरळमधील तिरुवनंतपुरम येथून दुबईला पोहोचलेले एमिरेट्स एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर उतरताना अचानक कोसळले. विमान उतरताच त्याला आग लागली. मात्र विमानतळ प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून सर्व २८२ प्रवासी आणि १८ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे जगातील सर्वात वर्दळ असलेले दुबईचे हे विमानतळ बंद करावे लागले. २८२ पैकी २२८ प्रवासी भारतीय आहेत. दरम्यान, विमान कोसळल्यानंतर प्रवाशांना लगेच बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आले होते. विमानाला भीषण आग लागली होती. कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची भीती होती. कधीही विमानात ब्लास्ट झाला असता. सगळे प्रवासी जिवानिशी गेले असते. असे असतानाही काही प्रवासी लगेच न उतरला लॅपटॉप आणि बॅग शोधताना दिसून आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एमिरेट्स एअरलाइन्सचे हे ईके ५२१ हे विमान सकाळी १०.१९ वाजता तिरुअनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला रवाना झाले होते. ते दुबई विमानतळावर १२ वा. ५० मिनिटांनी पोहोचले. विमान उतरत असतानाच मोठा आवाज झाला आणि सगळीकडे धूर पसरला. स्फोटाचाही आवाज ऐकू आला. हा प्रकार पाहून विमानातील अधिकाऱ्यांनी सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले आणि सर्वांना तत्काळ बाहेर पडण्याची सूचना केली.

तिरुअनंतपुरम येथील विमानतळाचे संचालक जॉर्ज थरक्कन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या विमानात २२६ भारतीय प्रवासी तर ७४ विदेशी प्रवासी होते. विदेशी प्रवाशांपैकी २४ जण ब्रिटनचे, ११ जण संयुक्त अरब अमिरातीचे तर प्रत्येकी ६ जण अमेरिका आणि सौदी अरेबियाचे होते.सुरुवातीला विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडणेही अत्यंत कठीण झाले होते. प्रवासी आणखी मिनिटभर आतच राहिले असते तर मोठा अनर्थ झाला असता. विमानात आग लागली आहे हे पाहून काही प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुवाहाटीत इंडिगोची दोन विमाने समोरासमोर
गुवाहाटीत मंगळवारी सायंकाळी इंडिगोच्या दोन विमानांचा अपघात टळला. मुंबईहून गुवाहाटीला येणारे विमान गोपीनाथ बारडोलोई विमानतळावर उतरणार होते, पण खराब हवामानामुळे त्याला २५० ते ३०० फूट खाली यावे लागले. त्याच वेळी चेन्नईला जाणारे इंडिगोचे दुसरे विमान उड्डाण करत होते. दोन्ही विमाने समोरासमोर आली. पण एका वैमानिकाने त्वरित हे विमान बाजूला घेतले. त्यामुळे मोठा अपघात टळला.

उतरण्याच्या प्रयत्नात काही जण जखमी
या अपघातातून बचावलेल्या काही प्रवाशांन आपबीती कथन केली. शआजी नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, विमान कोसळल्यानंतर विमानाच्या इंजिनने पेट घेतला. मी, माझी पत्नी आणि तीन मुले थोडक्यात बचावलो. विमान उतरत असतानााच मोठा आवाज ऐकू आला. सर्वांना त्वरित उतरण्याचा आदेश मिळाला. आम्ही त्वरित खाली उतरलो. खाली उतरण्याच्या प्रयत्नात मला आणि माझ्या पत्नीला जखमही झाली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ आणि फोटोज्... अखेरच्या स्लाईडवर बघा, विमानातून लगेच उतरण्याऐवजी लॅपटॉप आणि बॅग शोधताना दिसले प्रवासी.....
बातम्या आणखी आहेत...