आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encounter Between Police Red Sandalwood Smugglers In Andhra Pradesh News In Marathi

20 चंदन तस्करांचे एनकाउंटर: दोन राज्यांत जुंपली, न्यायालयीन चौकशीचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तूर- आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील घनदाट जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 20 चंदन तस्करांचा एनकाउंटर करण्‍यात आला. पोलिस आणि एसटीएफने मंगळवारी सकाळी पाच वाजता चंद्रागिरीच्या जंगलात ही संयुक्त कारवाई केली. सर्व तस्कार तमिळनाडूमधील होते. त्यामुळे तमिळनाडु आणि आंध्र प्रदेशात जुंपली असून दोन्ही राज्ये आमने-सामने आले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तमिळनाडुमधील एमडीएमके नेता वाइको म्हणाले की, आंध्र प्रदेश पोलिसांनी तस्करांना अटक करून त्यांना कोर्टात हजर करायला हवे होते.परंतु, पोलिसांनी तसे न करता त्यांची क्रुरपडे हत्या केली. आंध्रचे डीजीपी एम.कांता राव यांनी वाइको यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तस्करांनी पोलिसांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. परिणामी पोलिसांना स्वरक्षणासाठी तस्करांवर गोळीबार करावा लागला.
आंध्र प्रदेशातील चंदन तस्करी रोखण्यासाठी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी एसटीएफची स्थापना केली आहे. एसटीएफच्या जवानांकडे अत्याधुनिक शस्रास्त्र देण्यात आहेत.

काय आहे प्रकरण
चित्तूर येथील जंगलात गोपनिय माहितीच्या आधारे आंध्र प्रदेश पोलिस आणि एसटीएफने मंगळवार (7 एप्रिल) सकाळी सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी तस्कर चंदनाच्या लाकडांची तस्करी करत होते. पोलिसांनी सगळ्यांना जिवंत पकडण्याचे प्रयत्न केला. परंतु, तस्करांनी धारदार शस्त्र आणि दगडांनी पोलिसांवर हल्ला केला. तस्कारांना पोलिसांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. यात 20 तस्कर मारले गेले. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा जंगलात 80 तस्कर होते. पोलिस कारवाईत मारले गेलेले सर्व तस्कार वॉन्टेड होते. पोलिसांना ते अनेक द‍िवसांपासून हुलकावणीही देत होते.
चित्तूर येथील जंगलात लाल चंदनाची झाडे आहेत. लाल चंदन खूप महाग असते. दरम्यान चंद्रागिरीच्या जंगलात अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आणि एसटीएफचे जवान तस्करांचा शोध घेत आहेत.