श्रीनगर - कश्मीरच्या अनंतनाग भागात अचबल बस स्टँडजवळ आज (शनिवार) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एका सीआरपीएफ जवानसह पाच व्यक्ती जखमी झाल्यात. पोलिससूत्रांनुसार, ग्रेनेड फेकले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवून पोलिसांनी या परिसरातील घरे खाली केली आहेत. दरम्यान, एकाही दहशवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसून, सैन्याकडून हा भागात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे जम्मू-कश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात सेना आणि दहशतवाद्यांमध्ये एनकाउंटर झाल्याचे वृत्त आहे. मुगल रोडवर सेना आणि दहशवाद्यांमध्ये फायरिंग झाली.
झारखंडमध्ये पोलिस नक्षलीच्या चकमक
जम्मू-कश्मीरमध्ये दहशवादी तर झारखंडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये पोलिसांनी सिलवेस्टर नावाच्या एका नक्षलवादी नेत्याला ठार केल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस होते. ही चकमक बोकोरी जिल्ह्यातील सेंटर कोलफिल्ड लिमिटेडच्या परिसरात झाली. या ठिकाणी शंभराहून अधिक नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. दरम्यान, कंपनींची 30 वाहने पेटवून देण्यात आली.
पुढील स्लाइडवर पाहा जम्मू काश्मीरमधील चकमकीचे फोटो