आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encounter in jammu and kashmir gallantry medal awarded army officer killed

26 जानेवारीलाच जाहीर झाले होते वीरता मेडल, दुस-याच दिवशी कश्मीरात शहीद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- शहीद झालेले कर्नल एम एन राय)
नवी दिल्ली/श्रीनगर- जम्मू-कश्मीरमधील पुलावामा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज एक लष्कराचा एक अधिकारी आणि पोलिस कर्मचारी शहीद झाले. शहीद झालेल्या अधिका-याचे नाव आहे कर्नल एम एन राय आहे तर हेड कॉन्स्टेबल संजीव कुमार हे ही शहीद झाले आहेत. राय यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वीरता पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच कर्नल राय शहीद झाले. लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ही चकमक श्रीनगरपासून 36 किमी दूर मिंडोरा गावात झाली.
या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. शहीद झालेले कर्नल एम एन राय 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. कर्नल राय यांना गेल्या वर्षी दक्षिण कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात केल्याबद्दल युद्ध सेवा मेडलने गौरविण्यात आले होते.
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन्हीही दहशतवादी स्थानिक रहिवासी होते. चकमक त्या वेळी सुरु झाली जेव्हा गुप्त सूचनांच्या आधारे राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी पोलिसांसमवेत संयुक्त सर्च ऑपरेशन सुरु केले. याबाबत सांगितले जात आहे की, काही स्थानिक लोकांच्या मदतीने काही हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी लपले होते. मारले गेलेले दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. आदिल खान आणि शिराज दार अशी त्यांची नावे आहेत. या दोघांचे हिजबुलशी संबंध होते. आदिल मिंडोरा गावात राहत होता. घटना स्थळांवरून पोलिसांनी व लष्करांनी मोठी हत्यारे जप्त केली आहेत.

पुढे स्लाईडसच्या माध्यमातून शहीद झालेल्या संजयकुमार व दहशतवाद्यांची छायाचित्रे पाहा...