आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K : बांदिपुरातील चकमक संपली, एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जवान शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात आर्मी आणि दहशतवाद्यांमध्ये एन्काऊंटर सुरू आहे. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलेले असून 3 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 5 जवान जखमी झाल्याचेही समोर येत आहे. हाजीन परिसरात हे एन्काऊंटर झाले आहे. 
 
रविवारी कुलगाममध्ये जवानांनी हिजबुल मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना मारले होते. तर 3 दहशतवादी जखमी अवस्थेत जंगलात पळून गेले होते. दो जवानही या कारवाईत शहीद झाले होते. तर अधिकाऱ्यांसह जखमी झालेल्या तिघांना विमानाद्वारे श्रीनगरला आणले होते. 

एन्काऊंटरनंतर लोकांचे आंदोलन.. 
- कुलगाममध्ये एन्काऊंटरनंतर लोकांनी आंदोलन केले. साऊथ काश्मीरच्या कुलगामला लागून असलेल्या नगबाल फ्रीसल गावात शेकडो लोक घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले होते. 
- यादरम्यान गर्दीला पांगवण्यासाठी सेक्युरिटी फोर्सेसने फायरिंग केले आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. 
- लोकांनी सेक्युरिटी लाइन क्रॉस करून एन्काऊंटर साइटकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. 
- जेव्हा प्रोटेस्टर्स थांबले नाहीत, तेव्हा सेक्युरिटी फोर्सेसने लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. 
- आंदोलकांनी दगडफेक केली तेव्हा सेक्युरिटी फोर्सेसने फायरिंग केली. 
- आंदोलकांवरिोधातील चकमकीत एकाचा मृत्यू झाला असून 15 जखमी झाले आहेत. 

इनपुट मिळाल्यानंतर सुरू केले ऑपरेशन 
- सेक्युरिटी फोर्सेसने रविवारी पहाटे 4.30 वाजता संपूर्ण परिशराला घेराव घातला. प्रत्येक घरामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हाच दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केले होते. 
- शहीद जवानांमध्ये लान्स नायक रघुवीर सिंह आणि लान्स नायक गोपाल सिंह भदोरिया यांचा समावेश आहे. 
- मृत दहशतवाद्यांमध्ये मुदसीर अहमद, फारूख अहमद डार, अजहर अहमद यांचा समावेश होता. चौथ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. 
- 4 शस्त्रांसह दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. एन्काऊंटरनंतर काही गावकऱ्यांनी जवानांच्या तुकडीवर दगडफेकही केली.
 
पुढे पाहा, मंगळवारी झालेल्या ऑपरेशनचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...