आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भररस्त्यात 18 वार करुन प्रेमिकेची निर्घृण हत्या, प्रियकर आहे इंजिनिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (राजस्थान)- येथील एका प्रियकराने भररस्त्यात सर्वांसमोर प्रेयसीवर चाकूने हल्ला चढवला. तब्बल 18 वार करुन तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला लोकांनी पकडले. त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार रेकॉर्ड झाला आहे.
प्रियकर आहे इंजिनिअर तर प्रियसी नर्स
- प्रियकराचे नाव भावेश हिरजी वेगडा तर प्रेयसीचे नाव भाविका छगनभाई दाफडा असे आहे.
- नटेश्वर मंदिराजवळ भावेशने भाविकावर चाकूने हल्ला चढवला. त्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केला.
- भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी भावेशला अटक केली आहे.
दीड वर्षांपासून होते प्रेमसंबंध
- भावेश इंजिनिअरिंगला आहे. कालावाड येथील हॉस्टेलमध्ये तो राहतो.
- भाविका राजकोटमधील एका हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करते. दोघांमध्ये दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
- गेल्या काही दिवसांपूर्वी काही कारणांवरुन दोघांमध्ये तणाव झाला होता. दोघे एकमेकांशी बोलत नव्हते.
भाविका 'बचाव' 'बचाव' ओरडत होती
- भावेशने आधी भाविकासोबत भररस्त्यातच भांडण केले. त्यानंतर त्याने लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला. सपासप वार करण्यास सुरवात केली.
- यावेळी भाविका बचाव बचाव अशी ओरडत होती. पण कुणीही समोर आले नाही. यावेळी काही लोकांनी पुढे येण्याच्या प्रयत्न केला.
- पण भावेश याने त्यांनाही धमकी दिली. त्यामुळे समोर आलेले लोक मागे हटले. तो प्रचंड चिडून वार करत होता.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...