आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपी : प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या काकूचा पुतणीने काढला काटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत निर्मला यांचा मृतदेह. (इनसेट-निर्मला सिंह) - Divya Marathi
मृत निर्मला यांचा मृतदेह. (इनसेट-निर्मला सिंह)
मिरत - तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या PWD च्या एका इंजिनियरच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांना एका गटारामध्ये आढळला आहे. निर्मला नावाच्या या महिलेच्या हत्येच्या आरोपात या महिलेच्या पुतणीला प्रियकरासह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला यांनी या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. 17 जूनच्या रात्री ही हत्या झाली होती.

प्रकरण काय?
आरोपी शालू ही बीबीएची विद्यार्थिनी आहे. ती निर्मला यांच्याकडे राहून शिक्षण घेत होती. तिचे कशिश नावाच्या एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण होते. निर्मला यांना त्याची माहिती लागली होती. निर्मला यांना जेव्हा ही बाब समजली त्यावेळी त्या शालूला या मुद्यावरून रागावल्या. सुत्रांनी दिलेल्या माहतीनुसार शालू काही दिवसांपूर्वी गर्भवती राहिली होती व तिने अबॉर्शनही केले होते. त्यासंबंधिची कागदपत्रे पाहून निर्मला शालूला रागावल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शालूने कट रचून निर्मलाला गुंगीचे औषध पाजले आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह एका गटारात फेकून दिला.

पोलिसांना होता संशय
तपासादरम्यान पोलिसांना शालूवर संशय आल्याचे कारण म्हणजे शालू आणि कशिश दोघांचाही फोन लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या स्टाइलने चौकशी करताच या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेहाची िवल्हेवाट लावण्यासाठी मदत केलेल्या कशिशच्या एका मित्रालाही अटक करण्यात आली. शालूच्या दुसऱ्या एका काकूलाही याबद्दल माहिती होती पण तिनेही सर्व पोलिसांपासून लपवल्याने तिलाही अटक करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ओढणीद्वारे फाशी देऊन केली हत्या...
बातम्या आणखी आहेत...