आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 राज्यांमध्ये हायअलर्ट, सीमेजवळ 10 किमी भाग केला रिकामा, मोदींनी बोलवली ऑल पार्टी मीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमिवर सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. - Divya Marathi
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमिवर सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकिस्तानी सीमेत घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त करुन 38 दहशतवादी ठार मारल्याने पाकिस्तान चिडला आहे.त्यामुळे भारतावर प्रतिहल्ला होण्याची शक्यता गृहित धरुन जम्मू-काश्मिर, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. सीमेजवळ असलेला 10 किलोमीटरचा भाग रिकामा करण्यात आला आहे. तसेच कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी लष्करी सज्जता ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षिय बैठक बोलवली आहे.
पंजाबमधील सीमेचा ताबा लष्कराकडे
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मिर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.
- यावेळी त्यांनी सीमा परिसरातील काही गाव आणि वसाहती रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले.
- पंजाबमधील सीमेवर असलेल्या बीएसएफ जवानांना मागे घेण्यात आले असून त्यांची जागा लष्कराने घेतली आहे.
- सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आयजी डॉ. बी.आर. मेघवाल यांनी सांगितले, की जर युद्ध झाले तर पाकिस्तान पुन्हा युद्ध करण्याच्या लायकीचा राहाणार नाही.

वाळवंटात युद्धसराव करत आहे पाकिस्तान...
- राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी लष्कराने भारतीय जवानांना चिथावण्याचे काम सुरु केले आहे. याआधी जैसलमेर व गंगानगरलगतच्या सीमा भागात पाकिस्तानमध्ये मोठी हलचाल दिसत आहे.
- जैसलमेरपासून जवळपास 20-30 किलोमीटरच्या परिसरात पाकिस्तानने 22 सप्टेंबारपासून 'डेजर्ट वार गेम एक्सरसाइज' सुरु केली होती. या युद्धसरावातून पाकिस्तानी लष्कर शक्तिप्रदर्शन करत आहे.
- येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत हा युद्धसराव सुरु राहाणार असून त्यात पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दल सहभाग घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, BSF अलर्ट, जवानाने स्वत:च नाकारली सुटी...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...