आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Enraged Mob Makes A Nuisance Amid Religious Procession

PHOTOS: धार्मिक मिरवणुकीला गालबोट, उग्र जमावाने वाहने - दुकाने पेटवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडमधील गिरिडीह येथे रविवारी एका धार्मिक मिरवणुकी दरम्यान संतप्त जमावाने जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड केली. यात डझनावर वाहने आणि दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडले. संतप्त जमावाने जवळच्या एका धार्मिक स्थळावरही दगडफेक केली. यात काही लोक जखमी झाले. या घटनेनंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, जमाव का संतप्त झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. स्थानिकांचा आरोप आहे, की झाला प्रकरा हा पूर्वनियोजीत होता. त्यांचा आरोप आहे, की मिरवणुकीत सहभागी लोक चिथावणीखोर घोषणा देत होते. त्यामुळे वाद चिघळला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संतप्त जमावाने केलेली जाळपोळ आणि तोडफोड...