आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात ८४ शंकराचार्य बोगस, सिंहस्थामध्ये चौघांनाच प्रवेश, आखाडा परिषद अध्यक्षांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - देशात ८४ शंकराचार्य बोगस आहेत. मूळ पीठे फक्त चारच असून, तेथील शंकराचार्यांनाच मान्यता आहे. सिंहस्थात त्यांनाच प्रवेश मिळेल. बोगस शंकराचार्य उज्जैन सिंहस्थाला जाऊ शकणार नाहीत.
बनावट लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक आखाडा आपले साधू, संत, महामंडलेश्वरांना ओळखपत्र देईल. अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सिंहस्थाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी नरेंद्रगिरीजी आले होते. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि वासुदेवानंदजी यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचेही काम आखाडा परिषद करील, असे नरेंद्रगिरीजी यांनी सांगितले.

नाशिकनंतर उज्जैनचा मुहूर्त
नाशिकचा कुंभमेळा आटोपल्यानंतर उज्जैन सिंहस्थाचा मुहूर्त काढला जाईल. किती शाही स्नान होतील तेही ठरेल. १३ आखाड्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचे नरेंद्रगिरी यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...