आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या शिकवणीने पुसला 'अपशकुनी' चा डाग, अपंग दामिनीने साकारला विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - दामिनी अकरावीत शिकणारी १७ वर्षांची तरुणी आहे. छत्तीसगडमधील बिरगावात जेव्हा दामिनी जन्मली तेव्हा तिला हातच नव्हते. हे पाहून आई माधुरी सेन सुन्न झाल्या. मुलीचे कसे होणार असा प्रश्न त्यांना पडला. कुटुंबातल सर्वांनी तर मुलीला अशुभच ठरवले. कारण तिला हातच नव्हते. एकीकडे दामिनीवर नियतीचा आघात तर दुसरीकडे समाजाचे ताशेरे असा दुहेरी अन्याय होत होता. आई माधुरींनी स्वत:ला सावरले.
शक्ती बनून त्या दामिनीच्या मागे ठामपणे उभ्या ठाकल्या. त्यांनी संकल्प केला की, काहीही झाले तरी माझी मुलगी जगात नाव कमवेल. आज तिने गोल्डन बुका ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. तसेच दामिनीचा संपूर्ण कुटुंब व शेजारी, आप्तेष्ठांनाही अभिमान वाटतो आहे. आई माधुरी म्हणाल्या त्या वेळी मुलगी अशी झाल्याचे वाईट वाटले नाही. तर तिला लोकांनी अशुभ म्हटल्याचे वाईट वाटले. हे कसले जग, समाज आहे?

आईच्या पायांत दिसला स्वर्ग : आईच्या चरणांत स्वर्ग असतो असे म्हणतात, दामिनीच्या बाबतीत ते शब्दश: खरे आहे. दामिनीने एका तासात पायाने ३८ पेंटिंग तयार करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. तिने २०१५ मध्ये हा विक्रम केला आहे. दामिनी सांगते की, मला हात नव्हते. तेव्हाच बहुधा आईने ठरवले होते की, ती तिच्या हातांचा उपयोग मला काम शिकवण्यासाठी करणार नाही. त्यामुळे ती आधी सर्व कामे पायाने करायला शिकली व त्यानंतर ती मला शिकवत असे. ए, बी, सी, डी, लिहिण्यापासून क, ख, ग, सह अंक,चित्रे काढण्याचा सगळा सराव मला आईच्या पायांनीच दिला. छाया : सुधीर सागर