आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी तलाक प्रकरणी याचिकाकर्ती इशरतला नातेवाइकांच्या धमक्या, संरक्षणाची केली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या पाच याचिकाकर्त्यांपैकी एक इशरत जहां हिला सासुरवाडीचे लोक आणि शेजाऱ्यांकडून धमकावले जात आहे. या याचिकांवरूनच सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे.
 
दरम्यान, इशरतने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून आपल्याला व मुलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. सध्या ती हावडा भागात राहते. याच भागात तिच्या सासुरवाडीचेही काही लोक राहतात. इशरतला पतीने २०१४मध्ये दुबईहून फोनवर तलाक दिला होता.
बातम्या आणखी आहेत...