आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eve Teasers Beated Till Death In Begusarya Bihar

शाळकरी मुलींची काढली छेड; गावकर्‍यांकडून यथेच्छ धुलाई, दोघे ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पडलेला मृतदेह नेताना पोलिस कर्मचारी - Divya Marathi
घटनास्थळी पडलेला मृतदेह नेताना पोलिस कर्मचारी
बेगुसराय (बिहार) - बिहारच्या बेगुसराय जिल्हातील रामदीरी गावात दोन टवाळखोर गावकऱ्यांच्या मारहाणीत ठार झाले. येणाऱ्या - जाणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढणे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे, यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाणीत त्यांचा मृत्यु झाला.
काय आहे प्रकरण
गावातील एका रस्त्यावर बसून शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या मुलींची छेड काढणे. त्यांच्यावर कॉमेंट्स करणे हा या टवाळखोरांचा नित्यक्रम होता. याशिवाय त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कोणी त्यांच्या नादी लागत नव्हते. गुरुवारी मात्र पाणी डोक्यावरुन गेले. त्यांनी दोन तरुणींची छेड काढली. त्याचा जाब विचारण्यासाठी लोक गेले तेव्हा कार्बाइन आणि पिस्तूल घेऊन बसलेल्या टवाळखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एका गावकऱ्याच्या दंडाला गोळी लागली. त्यानंतर गावकरी संतप्त झाले आणि जमाव त्यांच्यावर तुटून पडला. टवाळखोरांच्या गोळीने जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काय झाले होते
गुरुवारी सायंकाळी शाळेतून घरी परत असलेल्या दोन मुलींची कन्हय्या कुमार आणि श्रवण कुमार यांनी छेड काढली. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्याकडे मुलींनी दुर्लक्ष केले. दोन्ही टवाळखोरांनी हद्द ओलांडत त्यांना स्पर्ष केला. याची माहिती मुलींनी घरी दिली. मुलींच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिक त्यांना समज देण्यासाठी गेले. तेव्हा टवाळखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि प्रकरण चिघळले.
पोलिसांनी पिस्तूल जप्त केले
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संतप्त गावकऱ्यांना पांगवले. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन मृतदेह आणि एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. टवाळखोरांची एक कार्बाइन घटनास्थळावरुन चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा संबंधीत फोटो